प्रवाश्यांनी प्रवासादरम्यानच वाहकाला अज्ञातस्थळी नेऊन लुटले

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :- एका पाच जणांच्या टोळक्याने प्रवासाचा बहाणा करून चक्क वाहनचालकाला लुटल्याची घटना नगर जिल्ह्यात घडली आहे.

याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात पाच प्रवाशांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, दत्तात्रय खंडू हापसे वय ३२ रा. टाकळीमिया राहुरी हे प्रवासी वाहन चालवितात.

एके दिवशी ते राहुरी येथून नगरकडे घेऊन प्रवाशांना त्यांच्या चार चाकी वाहनातून घेऊन निघाले.

त्यांच्या वाहनात बसलेल्या पाच अनोळखी प्रवाशांनी राहुरी तालुक्यातील नांदगाव फाटा येथून त्यांच्या डोळ्यात तिखट टाकून गळ्याला टोकदार वस्तू लावून पाठीमागील सीटच्या मध्ये दाबून धरून पुणे मार्गाने पारनेर तालुक्यातील सुपा येथे घेऊन गेले.

तेथे गळ्याला टोकदार वस्तू लावून त्यांच्याकडील एटीएम कार्ड हिसकावून घेत त्याचा पासवर्ड विचारला. तसेच चार चाकी वाहन असे मिळून ५ लाख रुपयांचा ऐवज घेऊन पसार झाले.

याप्रकरणी हापसे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शहराचे पोलीस उपाधीक्षक ढुमे व पोलीस निरीक्षक माणगावकर यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News