अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :-कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची दाहकता मोठी असून दररोज शेकडो बाधित रुग्ण आढळून येत आहे. रुग्णसेवेत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही याची काळजी घ्या.
प्रत्येक बाधित रुग्ण हे फक्त माझ्या मतदार संघातील नाही, तर ते माझ्या परिवारातील सदस्य आहेत. त्यामुळे कोणत्याही अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांकडून रुग्णसेवेत कमतरता आढळून आल्यास त्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा आमदार आशुतोष काळे यांनी दिला.
आमदार काळे यांनी तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली. आमदार काळे म्हणाले, मागील वर्षी आलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेची तीव्रता कमी होती.
दुसऱ्या लाटेने सर्वत्र हाहाकार उडाला असून २० ते ५० वयोगटातील नागरिकांना जीव गमवावा लागला. अशा परिस्थितीत शासनाने तिसरी लाट येण्याचा अंदाज वर्तवला असून या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना आहे. त्यामुळे आरोग्य विभाग व प्रशासनाने अजिबात गाफील राहू नये, अशा सूचना दिल्या.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|