पवार कुटुंबीय हे फक्त बोलत नाहीत तर करून दाखवतात

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:-अहमदनगर -कर्जत येथे एसटी आगाराचे भूमिपूजन आमदार रोहित पवार व कर्जत तालुक्यातील एसटीचे सर्व निवृत्त कर्मचारी शासकीय अधिकारी यांच्या हस्ते झाले.

यामुळे तालुक्यातील जनतेचे अनेक पिढ्यांचे एसटी आगाराचे स्वप्न पूर्ण करता आले, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी कर्जत येथे बोलताना केले.

यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, कर्जत तालुक्यातील जनतेची खासकरून विद्यार्थ्यांची अनेक पिढ्यांचे स्वप्न होते की कर्जतचा एसटी डेपो असावा आणि ते स्वप्न छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने पूर्ण होत आहे.

यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मिळाला असून पुढील दीड वर्षांमध्ये एसटीचे आगार पूर्ण होईल. यासाठी 50 गाड्या मिळणार असून त्या कर्जतहून ती इतरत्र तालुका जिल्हा राज्य पातळीवर धावणार आहेत.

दरम्यान आम्ही केवळ घोषणा किंवा निवडणुकीपुरते शब्द देत नाही तर ते करून देखील दाखवतो. तसेच पवार कुटुंबीय नेहमीच सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्यांच्यासाठी काम करतो.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व परिवहन मंत्री अनिल परब यांच्या सहकार्यामधून एसटी आगाराचे स्वप्न आज पूर्ण होत आहे. याप्रसंगी राजेंद्र पवार.,सुनंदाताई पवार,

आबा गुळवे, प्रांत अधिकारी, अर्चना नाष्टे उपविभागीय पोलिस अधिकारी, अण्णासाहेब जाधव एसटीचे विभागीय अधिकारी यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe