अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :-शहर विकासाबरोबर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध आहे. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे.
त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी सोमवारी महापालिकेच्या सर्व विभागांची बैठक घेऊन प्रलंबित कामांना गती देण्यासाठी सूचना देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन,आ. संग्राम जगताप यांनी केले.
आमदार जगताप म्हणाले कि, शहरात कोरोना रुग्णांना व नातेवाईकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. रुग्णांना वेळेवर बेड,औषधे,ऑक्सिजन आदींसह विविध समस्या भासत आहे,
ते मिळवून देण्यासाठी काम सुरू आहे. याचं बरोबर शहर विकासाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सूचना केल्या आहे. सध्या कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन जाहीर झाले असल्यामुळे रस्त्याची कामे करायला रहदारीची अडचण निर्माण होत नाही.
यासाठी शहरांमधील विविध भागांमध्ये रस्त्याची कामे सुरू आहे. या सर्व प्रलंबित विकास कामांना गती देण्यासाठी प्रशासनाला सूचना देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाला जोडणाऱ्या स्टेट बँक रस्ता,चांदणी चौक रस्ता,नगर कॉलेज रस्ता,
वस्तुसंग्रहालय रस्ताचे सुरू असलेल्या कामाची पाहणी करताना आ. संग्राम जगताप, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले,शहर अभियंता सुरेश इथापे,इंजि. श्रीकांत निंबाळकर,भुपेंद्र परदेशी, सोनू चौधरी, ठेकेदार भैय्या वाबळे आदि उपस्थित होते.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|