अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :- करोना काळात अनेक आर्थिक घडामोडी विस्कटलेल्या पाहायला मिळाल्या. मात्र या महाभयंकर आर्थिक संकटातही जिल्ह्यामध्ये ‘लाचखोरी’ काही थांबलेली दिसली नाही.
यामुळे वर्षभरही लाचखोर आपले काम अगदी प्रामाणिकपणे सुरूच ठेवत होते. करोनाच्या वर्षभरात नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४० सापळे लावून 48 लाचखोर अधिकारी, कर्मचारी गजाआड केले.
यात सर्वाधिक कारवाई पोलीस दल व महसूल विभागात करण्यात आल्या. म्हणजेच लाचखोरीच्या प्रकरणात पोलीस दल अव्वल ठरले आहे.
यामध्ये 12 सापळा कारवाईत 14 पोलीस घरी गेले आहे. यामध्ये दोन पोलीस अधिकार्यांचा समावेश आहे. पोलिसांसाठी लाच घेणारा एक खाजगी इसमही लाचेच्या जाळ्यात अडकला आहे.
पोलीस दलाबरोबर दुसर्या क्रमांकावर महसूल विभागात सर्वाधिक लाचेच्या घटना समोर आल्या आहेत. 11 सापळा कारवाईत महसूल विभागातील ‘क्लास थ्री’ च्या नऊ लोकांवर व चार खाजगी इसमांवर कारवाई करण्यात आली आहे.
त्याचबरोबर विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी लाचखोरीत आघाडीवर असल्याचे दिसून येते.
करोना संकटकाळात सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याऐवजी या काळात काम करून देण्यासाठी अधिकारी, कर्मचार्यांकडून लाचेची मागणी करत अडवणूक करण्यात आली.
करोनाच्या काळात डॉक्टर, नर्स, पोलीस, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, होमगार्ड, तलाठी, पालिकांसह ग्रामपंचायत कर्मचार्यांचे हात करोना वॉरिअर्स म्हणून काम करत असताना काही भ्रष्ट लोकसेवकांनी लाच घेतली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|