लाखांचा गंडा घालणाऱ्या ‘त्या’ तोतया विक्रेत्यास पोलिसांनी केले गजाआड

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-अधिकृत विक्रेता असल्याचे भासवून स्वस्तात टायर देण्याचे आमिष दाखवत अनेकांना गंडा घालणाऱ्या तोतया विक्रेत्याला कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. परंतु या प्रकरणातील एकजण मात्र फरार झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कर्जत येथील टायरचे व्यापारी धनंजय दळवी व त्यांचे सहकारी यांची पुणे येथील गणेश पिंगळकर या इसमाने अधिकृत टायरचा विक्रेता आहे असे सांगून सुरुवातीस विश्वास संपादन करून 6 लाखाचे टायर विकत दिले.

दुसऱ्या वेळेस पैसे देऊन टायरही दिले नाही व पैसेही देण्यास टाळाटाळ केली. धनंजय दळवी यांचेकडन एकूण बारा लाख 83 हजार रुपये घेऊन त्यांना फक्त सहा लाख 83 हजार रुपये किमतीचे टायर दिले. यामुळे पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. दरम्यान दळवी यांच्या फिर्यादीवरून

गुन्ह्याचे तपासामध्ये कर्जत पोलिसांनी पुणे येथे जाऊन गोपनीय व इतर माहितीच्या आधारे तपास करून दाखल गुन्ह्यात सहभागी असलेला गणेश पिंगळकर याचा मित्र सुभाष जाधव (राहणार कोथरूड) येथून कोथरूड पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेऊन त्यास अटक केली आहे.

कर्जत पोलिस आल्याचा सुगावा गणेश पिंगळकर याला लागताच त्याने पुणे सोडून मुंबईकडे पलायन केले आहे. कर्जत पोलिस पिंगळकर याचा शोध घेत आहेत.

दरम्यान गणेश पिंगळकर याने कर्जत तालुक्यात बऱ्याच व्यापाऱ्यांची फसवणूक केली असण्याची शक्यता आहे. दाखल गुन्ह्यातील अटक आरोपी अमित सुभाष जाधव यास माननीय न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. फरार आरोपी गणेश कांतराव पिंगुळकर याचा शोध सुरु आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe