अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- पाच हजार रूपयांची लाच घेतांना अकोले येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असणारा पोलीस नाईक संदीप भाऊसाहेब पांडे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पोलीस ठाणे आवारातच रंगेहाथ पकडले.
त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, अकोले येथील घटनेत तक्रारदाराचे साडू व त्यांच्या दोन मुलांविरुद्ध दाखल असलेल्या
अदखलपात्र गुन्ह्यात दोन आरोपींविरुद्ध चॅप्टर केस दाखल करून त्यांचा लगेच जामीन करून देणे व त्यातील उर्वरित एका आरोपीविरुद्ध चॅप्टर केस न करता
त्याचे गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी पोलीस नाईक पांडे याने तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
अकोले पोलीस स्टेशन येथे पोलीस नाईक पांडे यास लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने,
अप्पर पोलीस अधीक्षक नीलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचत अधिकारी पोलीस निरीक्षक दीपक करांडे, हरीश खेडकर यांनी ही कारवाई केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम