रुग्णांच्या नातेवाईकांची ऑक्सिजनसाठीची पळापळ थांबणार -शितल जगताप

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे. ही गरज ओळखून जितो अहमदनगर व जय आनंद फाऊंडेशनच्या युवकांनी ऑक्सिजन बँकची निर्मिती केली.

ना नफा, ना तोटा या तत्वावर सेवाभावी वृत्तीने चालविण्यात येणार्‍या ऑक्सिजन बँकचा लोकार्पण नगरसेविका शितलताई जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उद्योजक सुनील मुनोत, गौतम मुनोत, डॉ.सचिन भंडारी, पोपटलाल भंडारी,

वसंत बोरा, विशाल शेटीया, सुमित मुनोत, जितोचे अमित मुथा, प्रितेश दुगड, अलोक मुनोत, तुषार कर्नावट, जय आनंद फाउंडेशनचे रितेश पारख, कमलेश भंडारी, संदेश कटारिया, सुमित लोढा, सीए किरण भंडारी, अनिल लुंकड, विनोद (पिंटू) कटारिया, सीए सौरभ भंडारी,

पियुष मुनोत, अमित काबरा, आनंद चोपडा, निलेश खिंवसरा, वैभव मेहेर आदी उपस्थित होते. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे. अनेक रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळणे कठिण झाले आहे.

तर कोरोना रुग्णांना उपचारासाठी जागा मिळेल त्या हॉस्पिटलमध्ये किंवा घरीच डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ऑक्सिजन लावले जात आहे. यामुळे शहरात ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा जाणवत आहे. काही दिवसांपुर्वी शहरात काही तास पुरेल एवढाच ऑक्सिजन साठा शिल्लक होता.

अशा गंभीर परिस्थितीमध्ये जय आनंद फाउंडेशनचे सुमित लोढा व कमलेश भंडारी यांनी मध्यरात्री एमआयडीसी मधील काही कंपनीतून पाच ते सहा ऑक्सिजन सिलेंडर गोळा करून त्या रुग्णालयातील रुग्णांची तात्पुरती गरज भागवली.

नंतर काही कंपनीचे मिळून पंचवीस ते तीस सिलेंडर जमा करून लहान रुग्णालयांची ऑक्सिजनसाठी होणारी धावपळ काही प्रमाणात थांबवण्याचा प्रयत्न केला. उद्योजक सुनिल मुनोत व गौतम मुनोत यांनी जितो अहमदनगरच्या माध्यमातून या कामासाठी तब्बल 50 ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करुन दिले.

हीच मिशन ऑक्सिजन सिलेंडरने आखेर बँकचे रुप धारण केले असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष रितेश पारख यांनी दिली. नगरसेविका शितलताई जगताप म्हणाल्या की, कोरोनाच्या संकटकाळात ऑक्सिजनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी पळापळ या उपक्रमाच्या माध्यमातून थांबण्यास मदत होणार आहे.

कोरोनाची गंभीर परिस्थिती पाहता ऑक्सिजन बँक उभारुन जितो अहमदनगर व जय आनंद फाऊंडेशनच्या युवकांनी एक आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. स्वत:च्या व कुटुंबाची पर्वा न करता युवकांनी दिलेले योगदान योगदान महत्त्वाचे आहे.

या संकटकाळात माणुसकीच्या भावनेने कार्य करण्याची आवश्यकता असून, कोरोनात तुम्ही काय योगदान दिले व कोणाला आधार दिला? भावी पिढी हे प्रश्‍न नक्की विचारेल. सर्वांनी आपल्या जबाबदारीचे भान ठेऊन योगदान देण्याचे त्यांनी आवाहन केले.

तर या ऑक्सिजन बँकेचे कौतुक केले. कमलेश भंडारी यांनी ऑक्सिजन बँकेच्या माध्यमातून प्रत्येक हॉस्पिटलला गरजेनुसार दिवसातून किमान 5 सिलेंडर देण्यात येणार आहे.

शहरात निर्माण झालेला ऑक्सिजनचा तुटवडा भरुन काढण्यासाठी ही बँक कार्यान्वीत करण्यात आली आहे. गरजू रुग्णांना याचा लाभ होणार असून, त्यांच्या नातेवाईकांना ऑक्सिजनसाठी पळापळ करावी लागणार नसल्याचे सांगितले.

भविष्यात आणखी सिलेंडरची गरज भासल्यास उपलब्ध करून देण्याची ग्वाही सुनील मुनोत व गौतम मुनोत यांनी दिली. अमित मुथा यांनी या उपक्रमाचा लहान रुग्णालयांना विशेष फायदा होणार असल्याची भावना व्यक्त केली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe