अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:-आज राज्याचे राज्यपाल देहरादून दौऱ्यावर राज्याच्या सरकारी विमानाने जात असतांना महाराष्ट्र सरकारने राज्यपालांच्या विमानास परवानगी अचानकपणे नाकारली.
त्यामुळे राज्यपालांना खाजगी विमानातून प्रवास करावा लागला. दरम्यान राज्यपालांना परवानगी नाकारल्याने राज्यात सत्ताधारी आणि विरोधकात आरोप प्रत्यारोप सुरू झाले असून
विधानपरिषदेतील १२ आमदारांच्या नियुक्तया रखडल्याने परवानगी नाकारण्यात आली की काय? असा संशय व्यक्त केला जात होता. दरम्यान यासंदर्भात राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं की,
राज्यपालांच्या विमानाला परवानगी नाकारणे हे काही प्रशासकीय कारणं किंवा तांत्रिक अडचण असू शकते त्याबाबत मला जास्त बोलता येणार नाही आणि त्याचा सबंध विधानपरिषदेच्या जागांशी नाही. परवानगी नाकारण्यासंदर्भात विधानपरिषदेतील आमदार नियुक्तीचा काहीही सबंध नाही.
याउलट विधानपरिषदेतील आमदार नियुक्त हे राज्यघटनेने दिलेले अधिकार असून राज्यपालांनी आमदार नियुक्तीला मंजुरी देणे अपेक्षित आहे अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved