महसूलमंत्री म्हणाले… कोवीड केअर सेंटर ही खरी आरोग्य मंदिर

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :-  एक व्यक्ती बाधित झाली तरी संपूर्ण कुटुंब बाधित होते आणि त्या कुटुंबाला अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. निष्काळजीपणामुळे अनेकांचे प्राण गेले.

करोनाच्या संकटात अनेक ठिकाणी सुरू झालेल्या कोविड केअर सेंटरमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सध्या ही कोवीड केअर सेंटर ही खरी आरोग्य मंदिर ठरली आहेत. असे गौरवोद्गार महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले.

संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील संस्कृती मंगल कार्यालयात जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे पाटील व सरपंच बाबासाहेब कांदळकर यांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात कोविड आरोग्य मंदिरास भेट व परिसरातील विविध गावांमधील पदाधिकार्‍यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

महसूल मंत्री थोरात म्हणाले, करोना संकटात अनेक कुटुंबांना मानसिक शारीरिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागला. करोना पासून स्वतःचे रक्षण करायचे असेल तर काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

ग्रामीण भागात अजूनही अनेकजण मास्कचा वापर करत नाही आणि त्याचा परिणाम बाधित होण्यामध्ये होतो. करोना संकटात महाराष्ट्रात महा विकास आघाडी सरकारने अत्यंत चांगले काम केले आहे.

कधीही करोना रुग्णांची आकडेवारी लपवली नाही. त्यामुळे रुग्ण संख्या जास्त दिसते आहे. मात्र रुग्णांचा शोध घेतल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार करून त्यांना लवकर बरे होता आले आहे.

परिणामी मृत्यूचा दर घटला आहे. ज्या राज्यांनी करोनाचे आकडे लपवले, त्यांची अवस्था काय आहे ते सर्व जग पाहते आहे.

गंगेच्या कडेला मृतदेह साचले, हे अत्यंत दुर्दैवी आहे. आपल्याला माणूस वाचवायचा आहे. आगामी करोना ची तिसरी लाट रोखण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News