अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती त्यांत भयावह होत चालली आहे. यातच दरदिवशी अनेक रुग्णांचा मृत्यू हा केवळ आवश्यक वैद्यकीय सेवा मिळत नसल्याने होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
यातच अनेक रुग्ण ऑक्सिजन भेटत नसल्याने मृत्यू पावत आहे. यावर उपाय म्हणून महसूलमंत्र्यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
जिल्हा नियोजन मंडळातून नगरचे जिल्हा शासकीय रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय कर्जत, पाथर्डी, संगमनेर व श्रीरामपूर येथे दररोज २५० जम्बो सिलिंडर क्षमतेचे ऑक्सिजन उत्पादन केंद्र उभारण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्याला ऑक्सिजनचा अधिक पुरवठा होईल.
जिल्हा नियोजन मंडळ, आमदार निधीतून १०० पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मशीन जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयांना पुरविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. महसूलमंत्री थोरात यांनी शनिवारी जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला.
यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी थोरात म्हणाले, बाधित रुग्णांसाठी होम क्वारंटाईन, होम आयसोलेशन पद्धतीचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. सर्व रुग्णांना संस्थात्मक क्वारंटाईन केले पाहिजे.
घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून लक्षणे असणाऱ्यांचे विलगीकरण करणे गरजेचे आहे. संगमनेरमध्ये या बाबीचा चांगला परिणाम दिसून आला. त्यामुळे बधितांची संख्या घटते आहे.
बाधित रुग्णांना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केल्यास केवळ औषधोपचारावर रुग्ण बरा होऊ शकतो. रुग्णांना ऑक्सिजन, इंजेक्शनची गरज पडत नाही.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|