धोका वाढतोय : दर मिनिटाला होतेय ‘इतक्या’ रुग्णांची नोंद

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-1 एप्रिल रोजी 11 ऑक्टोबरनंतर देशात कोरोनाची सर्वात मोठी वाढ पाहायला मिळाली. मार्च महिन्यासत झपाट्याने कोरोना रुग्णसंख्या वाढली.

कोरोना रुग्ण वाढीचा दर मिनिटाला 50 इतका आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोनामुळे आतापर्यंत 1,62,927 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 459 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सलग २२व्या दिवशी संक्रमणाचे प्रमाण वाढतच आहे.

यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 5,84,055 वर वाढली आहे. हे एकूण संक्रमणाच्या 4.78 टक्के आहे. देशात कोरोनाच्या 72,330 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यावर्षी प्रथमच, एकाच दिवशी इतक्या मोठ्या संख्येने संसर्ग झाल्याचे आढळले आहे.

आतापर्यंत एकूण संक्रमणाची संख्या 1,22,21,665 झाली आहे. 11 ऑक्टोबर 2020 रोजी 74,383 रुग्णांची नोंद झाली आहे. देशात रिकव्हरी रेट 93.89 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. यावर्षी 12 फेब्रुवारी रोजी 1,35,926 सक्रिय रुग्णांची नोंद झाली होती.

जी एकूण संक्रमणांच्या 1.25 टक्के होती. आतापर्यंत 1,14,74,683 लोकांनी कोरोनावर मात केली आहे, यासह मृत्यूचे प्रमाण 1.33 टक्क्यांवर गेली आहे. 7 ऑगस्ट रोजी देशात कोरोना संक्रमणाची संख्या 20 लाखांच्या पुढे गेली.

तर 16 सप्टेंबरला 50 लाखांचा आकडा गाठला. 19 डिसेंबरला हा आकडा एक कोटींच्या वर गेला आहे. आयसीएमआरनुसार 31 मार्चपर्यंत देशात 24,47,98,621 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे. बुधवारी 11,25,681 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe