मुलांमध्ये कोरोनाचा धोका वाढतोय; चार दिवसात 15 मुले वाढली बाधित

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :-  जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट अत्यंत गंभीर असल्याचे आतापर्यंत दिसून आले. कारण रुग्णसंख्या एवढ्या झपाट्याने वाढली त्याचबरोबरच मृत्यू देखील मोठ्या झपाट्याने झाले.

यातच आता एक मोठे संकट येऊ राहिले आहे. या लाटेमध्ये लहान मुले देखील मोठ्या प्रमाणावर बाधित होऊ लागले आहे.

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरात दि.24 ते 27 मे या चार दिवसांत 1 ते 16 वर्ष वयाचे 15 लहान मुले करोनाबाधित आढळले असल्याने करोनाची तिसरी लाट सुरु झाली की काय? या भितीने नागरिकांत घबराट पसरली आहे.

देवळाली प्रवरा शहरात नगर पालिकेच्या वतीने वॉर्डनिहाय रॅपिड टेस्ट केली जात आहे. करोनाबाधित आढळण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

शहरात सध्या लहान मुलांमध्ये करोनाची बाधा आढळून येत आहे.देवळाली प्रवरा नगर पालिकेस प्राप्त झालेल्या यादीनुसार दि.24 मे रोजी 1 ते 16 वयोगटातील 8 लहान मुलांना करोनाची लागण झाली आहे.

दरम्यान, कोव्हिड सेंटरमध्ये लहान बालकांवर उपचार करण्यासाठी बालरोगतज्ज्ञ नसल्याने लहान मुलांच्या पालकांना रुग्णास घेऊन शहराकडे धाव घ्यावी लागत आहे.

कोव्हिड सेंटरमध्ये बालरोगतज्ज्ञ उपलब्ध करावा, अशी मागणी पालक वर्गातून केली जात आहे. लहान मुलांच्या बाबतीत पालकांनी काळजी घ्यावी.

लहान मुलांना गर्दीपासून लांब ठेवावे. घरातील आजारी व्यक्तीजवळ लहान मुले जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe