…त्या आरोपीनेच वाहनाखाली उडी मारून जीव दिला

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :-  पोलिस कोठडीत असलेल्या आरोपीला न्यायालयात नेले जात असताना त्याने अवजड वाहनाखाली उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये आरोपीचा गाडीच्या चाकाखाली चिरडून मृत्यू झाला. जनार्दन चंद्रय्या बंडीवार (वय ४६, रा. राहाता) असे मृत आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, याबाबत अधिक माहिती अशी कि, राहता शहरातील जनार्दन बंडीवार याला दोन दिवसापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोपरगाव विभागीय अधिकाऱ्यांनी अटक केली होती. तो बनावट ताडी बनवून त्याची विक्री करीत असल्याच्या आरोपावरून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बाभळेश्वर येथील पथकाने त्याच्यावर कारवाई केली होती.

त्यास न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत आज, मंगळवारी संपत असल्याने आरोपी जनार्दन व त्याच्यासोबत दुसरा आरोपी अखिल बुढन शेख (वय ५१, रा. राहाता ) यांना न्यायालयात नेले जात होते.

यावेळी दोन्ही आरोपींना लघवी करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम सहायक संजय साठे हे बाभळेश्वर येथील बसस्थानकातील शौचालयाकडे घेऊन जात होते. तेव्हा जनार्दन याने बाभळेश्वर चौकातून जाणाऱ्या अवजड मालवाहतूक गाडीच्या मागील चाकाखाली अचानक उडी घेतली.

त्यामध्ये त्याचा चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी लोणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. आरोपीचा मृत्यू अपघातात झालाय की काही घातपात आहे? असा सवाल आरोपींच्या नातेवाईकांनी केलाय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News