अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होऊ लागला आहे. यामुळे दरदिवशी बाधितांची आकडेवारी मध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. करोनाची दुसरी लाट अतिशय गंभीर आहे.
त्यामुळे जास्त खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. असे प्रतिपादन महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महसूलमंत्री ना. थोरात रविवारी कोपरगाव दौर्यावर आले होते.
कृष्णाई मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत आरोग्य विभाग व प्रशासनाशी संवाद साधतांना सूचना केल्या.
कोपरगाव तालुक्यात आढळून येत असलेल्या करोना बाधित रुग्णांची संख्या लक्षात घेतल्यास निम्मे रुग्ण कोपरगाव शहरातील असून जास्तीत जास्त तपासण्या करून कोपरगाव शहरावर लक्ष केंद्रित करून करोनावर नियंत्रण मिळवावे अशा सूचना थोरात यांनी केल्या आहेत.
यावेळी कोपरगाव तालुकयातील करोना परिस्थितीबाबत आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या उपाय योजनांची माहिती देवून कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे परिस्थिती परिस्थिती अवघड होत चालली असल्याचे सांगितले.
बाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला असून 100 ऑक्सिजन बेड व 500 बेडचे जम्बो कोविड केअर सेंटर सुरु करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे. तालुक्याला ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडणार नाही याची प्रशासनाने काळजी घ्यावी.
रेमडीसीव्हर इंजक्शनचा पुरवठा सुरळीत करून रेमडीसीव्हर इंजक्शनचा काळा बाजार होणार नाही याची खबरदारी घेवून ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून सर्व कोविड केअर सेंटरला रेमडीसीव्हर इंजक्शनचा पुरवठा करावा.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|