‘बळीराजा’वरील संकटाची मालिका सुरूच..!

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- वादळी पावसाने राहाता तालुक्यात प्रचंड नुकसान; अनेकांचे संसार उघड्यावर अहमदनगर : सध्या सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे.

सर्व बंद असल्याने शेतमालाचे खूप नुकसान होत आहे. त्यातच परत अवकाळी पावसाने भर घातली आहे. त्यामुळे शेतकरी पुरता वैतागला आहे.

सोमवारी दुपारी अचानक आलेल्या वादळी पावसाने राहाता तालुक्यातील वाकडी परिसरात काही ठिकाणी शेती व घराचे मोठे नुकसान झाले.

या वादळी पावसाने वाकडी- चितळी रस्त्यावर असलेल्या चिंचमळा परिसरातील शेतकरी ज्ञानेश्वर काशिनाथ वाघ यांच्या घराचे छप्पर पूर्णपणे उडून गेल्याने वाघ यांचा संसार उघड्यावर पडला.

तर वाकडी परिसरात गारा व वादळी पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. याच वेळी ज्ञानेश्वर वाघ यांच्या घराचे छप्पर उडून गेले.

घरातील संसारउपयोगी साहित्य अस्तव्यस्त झाले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला आता राहण्याची मोठी समस्या निर्माण झाल्याने वाघ यांचे कुटुंब हताश झाले आहे.

वाघ यांचा वाकडी गावात छोटासा व्यवसाय आहे; मात्र सध्याच्या लॉकडाऊनमुळे तोही ठप्प आहे. अशा परिस्थितीमध्ये काय करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe