अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- पारनेर शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये असणाऱ्या आनंद शु पॅलेस या चप्पलच्या दुकानाला आग लागल्याची घटना घडली होती. दरम्यान या आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पारनेर शहरातील बाजारपेठेत असणाऱ्या प्रमोद गाडगे यांच्या मालकीचे आनंद शु पॅलेस या चप्पलच्या दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागली.
चप्पल दुकानाच्या दुसर्या मजल्यावर असणार्या चप्पलच्या गोडाऊनला आग लागल्यामुळे भीषण आगीचे लोळ बाहेर पडत होते.
आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे आग विझवण्यात अडथळा निर्माण होत होता.चप्पल दुकानाला आग लागल्याची माहिती परिसरात समजताच अनेक नागरिकांनी आग विझवण्यास प्रयत्न केले.
जवळपास पाऊण तासाने आग आटोक्यात आली. दुकानातील सर्व चप्पल व इतर साहित्य जळून खाक झाले.आगीत लाखो रुपयाचे नुकसान झाले झाली असण्याची शक्यता आहे.
ज्या ठिकाणी चप्पल दुकानाला आग लागली. ते ठिकाणी नगरपंचायत पासून हाकेच्या अंतरावर आहे. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिस प्रशासन युद्धपातळीवर काम करत असताना
नगरपंचायत प्रशासनाला आगाची कल्पनाही नव्हती. नगरपंचायतचे एकही कर्मचारी घटनास्थळी दाखल नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम