अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- आपल्या हिंदू धर्म संस्कृती मध्ये गाईला माते ची उपमा दिलेली आहे शेतकर्याला अर्थिक मदत देणारा शाश्वत व्यवसाय म्हणून अहमदनगर जिल्ह्यात दुध धंद्या अस्तित्वात आहे.

या दुध धंद्यामध्ये शेतकर्यांना मदत करण्याच्या भावनेतून काही शेतकऱ्यांची मुलं पशुवैद्यकीय सेवेतउतरली . कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव पो.कोळपेवाडीचे भुमिपुत्र डाॅ.सुशिल बानाजी कोळपे हे पशु शस्त्रक्रिये मध्ये पारंगत आहेत .
निफाड तालुक्यातील कोळगाव येथील शेतकरी विनायक वाघ यांनी मंजूर येथील समाधान सोनवणे यांच्या माध्यमातून डॉ.कोळपे यांना कॉल करून सांगितले कि आमची गाय गेल्या दहा दिवसांपासुन काहीच खात नाही गाय तपासल्यावर डॉक्टरांनी आॉपरेशन चा सल्ला दिला कुटुंबाशी चर्चा करुन त्यांनी होकारही दिला.
आॉपरेशन पार पडले नेहमीच्या अनुभवाप्रमाणे गायीच्या पोटात खडी,दोन खिळे, पत्र्याचे तुकडे निघाले या बरोबरच या गोमतेच्या पोटात एक तोळ्याची अंगठीही निघाली गायीच्या आजारपणाच्या टेन्शनमध्ये ही वाघ कुटुंब अवाक झाले.गायीचा जीव वाचविल्याबद्दल डॉक्टरांचे आभार मानताना बळीराजाचे डोळे देखील पाणावले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम