राज्य सरकार आपल्या पाठीशी आहे – प्राजक्त तनपुरे

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झाले असले तरी लवकरच सर्वकाही सुरळीत सुरू होईल.

परंतु कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी प्रत्येकाने स्वतः बरोबर आपल्या कुटुंबाची देखील गर्दी न करता काळजी घ्यावी, असे आवाहन मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले.

पाथर्डी तालुक्यातील कोल्हार येथे मंत्री तनपुरे यांनी अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेत तालुक्याचा आढावा घेतला यावेळी उपस्थित काही गावातील नागरिकांच्या प्रश्नांची त्यांनी सोडवणूक केली.

यावेळी बोलताना मंत्री तनपुरे म्हणाले कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेकांच्या घरातील प्रमुख माणसं आपल्यातून निघून गेली. अनेकांची आर्थिक गैरसोय झाली.

राज्य सरकार आपल्या पाठीशी आहे, असे मंत्री तनपुरे म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे,

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, संभाजी पालवे, भरत पालवे, सरपंच अमोल वाघ, राजेंद्र पाठक, शिवाजी पालवे, रवींद्र मुळे, विलास टेमकर,

अशोक टेमकर, युवा नेते राजू शेख, महेश लवांडे, सुखदेव गीते, देवेंद्र गीते, तुळशीराम शिंदे, तहसीलदार श्याम वाडकर आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News