कोरोना संकटात राज्य सरकारने तृतीय पंथीयांना मदत करावी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- सध्या कोरोना संकटाच्या काळात संपूर्ण राज्यात जनता कर्फ्यू लागू झाला आहे. दिवसभर काम धंदा बंद असल्याने हातावर पोट असलेल्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

त्यात राज्यातील तृतीय पंथीय जे दारोदार भिक्षा मागून आपली उपजीविका करतात त्यांना एक वेळचे अन्न देखील मिळणे महाग झाले आहे.

त्यामुळे कोरोना संकट काळात राज्य सरकारने तृतीय पंथीयांना मदत करावी अशी विनंती करणारा इमेल युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम अनिल राठोड यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविला आहे.

कोरोनाचे संकट राज्यावर अधिक गडद होत असताना सर्व व्यवहार बंद ठेऊन सर्वाना घरात बसावे लागते आहे . पण यामुळे काबाड कष्ट करून आपले व कुटुंबाचे पोट भरणाऱ्यावर कोरोना मुळे नाही तर उपासमारीने जीव गमावण्याची वेळ आली आहे.

अशा स्थितीत राज्यातील तृतीय पंथीय बांधव की ज्यांची रोजी रोटी केवळ भिक्षेवर आहे. त्यांच्यासमोर तर मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

त्यामुळे राज्याच्या तृतीय पंथीय कल्याणकारी संस्थेचे राज्य अध्यक्ष काजल गुरु नायक नगरवाले यांनी राज्यातील तृतीय पंथीय समाजाची व्यथा मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम अनिल राठोड यांच्याकडे मदतीची याचना केली.

तेव्हा विक्रम राठोड यांनी त्यांचे निवेदन स्वीकारून त्याचा थेट उद्धव साहेब आणि राज्य सरकारच्या मुख्य सचिवांना इमेल करून संपर्क साधला.

या संदर्भात पाठपुरावा करून तृतीय पंथीयांना तात्काळ राज्य शासनाकडून मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन राठोड यांनी तृतीय पंथीयांच्या शिष्ट मंडळाला दिले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe