आठवड्याच्या सुरुवातीला नफेखोरीमुळे शेअर बाजार निर्देशांकांत घसरण

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केट मध्ये चढउतार पाहायला मिळतो आहे.

यातच पुन्हा एकदा कोरोनाने आक्रमण केल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळते आहे.

शेअर बाजाराचे निर्देशांक सध्या उच्च पातळीवर असल्यामुळे गुंतवणूकदार कमालीचे सावध झाले आहेत. त्यामुळे शेअर बाजारात खरेदी-विक्रीच्या लाटा येत आहेत.

दरम्यान आठवड्याची सुरुवात आज घसरणीने झाली आहे. दरम्यान आज बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 189 अंकांनी कमी होऊन 52,735 अंकावर बंद झाला.

तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 45 अंकांनी म्हणजे 0.29 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 15,814 अंकावर बंद झाला.

या शेअर्समध्ये वाढ… :- मात्र अशा परिस्थितीतही टाटा स्टील, टेक महिंद्रा, सन फार्मा, हिंदुस्तान युनिलिव्हर, डॉक्‍टर रेड्डीज या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली.

या शेअर्सला बसला फटका :- रिलायन्स इंडस्ट्रीजबरोबरच एचडीएफसी टीसीएस या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाल्यामुळे मुख्य निर्देशांकावर परिणाम झाला.

त्याचबरोबर अल्ट्राटेक सिमेंट, भारती एअरटेल, या कंपन्यांनाही विक्रीचा मारा सहन करावा लागला.