छप्पराच्या घराणे रात्रीतून घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- छप्पराच्या घराला लागलेल्या आगीत संसारोपयोगी वस्तू जळाल्याने श्रीरामपूर तालुक्यातील भोकर परिसरातील वडजाई शिवारातील आबासाहेब दत्तू बर्डे यांच्या कुटुंबाचे सुमारे सत्तर हजाराचे नुकसान झाले.(The house caught fire overnight )

हे कुटुंब घरात झोपलेले असताना मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. परंतु सुदैवाने कुठलीही जीवीतहानी झाली नाही. याबाबत अधिक माहिती अशी कि,

भोकर शिवारातील वडजाई परीसरात असलेल्या बारा खोंगळया तळ्याजवळ राहत असलेले आबासाहेब दत्तू बर्डे हे आपल्या कुटुंंबियांसह छप्पराच्या घरात झोपलेले असताना मध्यरात्रीच्या सुमारास अचानक छप्पराला आग लागली.

कुटूंबातील सदस्यांनी घराबाहेर पळ काढल्याने कुठलीही जीवीतहानी अथवा जखमी झाले नसले तरी या कुटुंबाच्या केवळ अंगावरील कपड्याशिवाय काहीच शिल्लक राहिले नाही.

यात या कुटुंबाचे सत्तर हजाराच्या मालमत्तेचे नुकसान झाले. आग नेमकी कशामुळे लागली, हे समजू शकले नाही. आगीची घटना समजताच कामगार तलाठी अशोक चितळकर यांनी तातडीने भेट देत पंचनामा केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe