अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- शनिवारी रात्री जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली.यावेळी झालेल्या वादळात देखील मोठे नुकसान झाले होते.
मात्र जीवितहानी झाली नव्हती. परंतु रविवारीदेखील काही भागाला वादळ व पावसाने झोडपून काढले. यात वादळातच बांधकाम सुरू असलेल्या एका घराची भिंत कोसळली अन् सहा वर्षांच्या चिमुकल्याचा त्याच मृत्यू झाला. तर इतर तिन कामगार जखमी झाले.
ही दुर्घटना श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगाव येथे घडली. आरव इंगावले असे या मुलाचे नाव आहे. शुक्रवारपासून जिल्ह्यातील काही भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. परंतु यावेळी जोरदार वारा देखील सुटलेला असतो त्यामुळे मोठी झाडे, घराचे पत्रे, विजेचेखांब, तारा तुटण्याच्या घटना घडल्या आहेत.
श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगाव येथील एका वस्तीवर गोरख इंगावले यांच्या घराचे बांधकाम चालू होते. रविवारी दुपारी परिसरात वादळी वारा सुटला.
यावेळी काम करत असलेल्या बांधकाम मजुर व आरव हे सर्वजण घराच्या बांधकामाच्या आडोशाला थांबले. परंतु वेगात आलेल्या वाऱ्याच्या झोताने सुमारे दहा फूट उंचीच्या चारही भिंती कोसळल्या यात आरव हा विटांच्या ढिगाऱ्या दबल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर तीन मजूर जखमी झाले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम