अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- राज्यासह देशभरात करोनाचा हाहाकार सुरू आहे. देशभरात चार लाख रुग्ण आढळून आलेत. ही महामारी रोखण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न केले जात आहे.
या संकटमय काळात अनेकजण सामाजिक भान बाळगतात मदतीसाठी पुढे सरसावले आहे. यातच एमबीए झालेले तुषार संजय पोटे यांनी गावातील युवकांना एकत्र आणून तालुक्याच्या सेवेसाठी,
रुग्णांची मदत म्हणून वैद्यकीय सुविधा देण्यासाठी एक हेल्पलाईन आणि वॉररुम सुरू केली आहे. कोरोना महामारीमुळे राज्यात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.
राज्यात रुग्णांना बेड, व्हेंटिलेटर्स इंजेक्शनचा तुटवडा भासतो आहे. खाजगी हॉस्पिटलमध्ये लूट सुरू असून वेळेत रुग्णवाहिका देखील मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
ह्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करत तरूणांनी एकत्र येत रूग्णांच्या मदतीसाठी वॉर रुम सुरू केली आहे. रूग्णांच्या नातेवाईकांना येणार्या अडचणी या वॉर रुम मार्फत सोडविल्या जात आहे.
एक पाऊल मातृभूमीसाठी हे ब्रीद वाक्य घेऊन आपल्या गावच्या लोकांसाठी काम करायला अनेक युवकांनी सहभाग घेतला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|