रेमडेसिवेरचा पुरवठा लवकरच – खा. डॉ. सुजय विखे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- राहाता तालुक्यातील कोविड रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब असताना रुग्णांवर उपचार करत असताना रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा व अपुरा ऑक्सिजन पुरवठा यामुळे शासकीय तथा खाजगी कोविड सेंटरला देखील रुग्णांवर उपचार करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहेत.

या अडचणी लक्षात घेऊन लवकरच पुरवठा सुरळीत होणेसाठी पुरेपूर प्रयत्न करणार असल्याची ग्वाही खा.डॉ.सुजय विखे पा. यांनी दिली.

खा. विखे पा. यांनी शिर्डी येथील अयोध्या कोविड सेंटरला भेट दिली असता राहाता तालुक्यातील सर्व खाजगी कोविड सेंटरच्या वतीने डॉ. स्वाधीन गाडेकर व डॉ. प्रशांत गोंदकर यांनी लवकरात लवकर रेमडेसीवीर इंजेक्शन तसेच ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा यासाठी निवेदन दिले.

सदर भेटीत अयोध्या कोविड सेंटरमध्ये भरती असलेल्या रुग्णांच्या तब्बेतीची खा. डॉ. विखे यांनी विचारपूस केली.

रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा दिला. डॉ. प्रशांत गोंदकर यांनी अयोध्या कोविड सेंटरची माहिती दिली.

याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष जगन्नाथ गोंदकर, नगरसेवक अशोक गायके, नगरसेवक नितीन कोते, अतुल गोंदकर आदी उपस्थित होते.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe