तालिबानी सैन्याने ‘हा’ देशच घेतला ताब्यात…राष्ट्रपतीं देश सोडून पळाले

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- गेल्या काही दिवसांपासून तालिबान आणि अफगाणिस्तान यामध्ये युद्ध सुरु आहे. अखेर अफगाणिस्तान हा देश तालिबानच्या ताब्यात गेला आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी देश सोडला आहे.

तालिबानच्या प्रतिनिधींसोबत काबुलमधील चर्चेनंतर गनी यांनी हा निर्णय घेतला. गनी यांच्यासोबत एनएसए हमदुल्लाह मोहीब यांच्यासह इतर नेत्यांनीही देश सोडला आहे. हे सर्व नेते शेजारीच्या ताजिकिस्तानमध्ये आश्रयाला गेले आहेत, असं सांगण्यात येतंय.

अमेरिका आणि नाटो फौजा अफगाणिस्तानातून परतण्याची मुदत जवळ येऊ लागताच सक्रिय झालेल्या तालिबानी बंडखोरांनी अवघ्या आठवडाभरातच जवळजवळ संपूर्ण देशावर ताबा मिळवला आहे. तालिबानने रविवारी राजधानी काबूलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देशाबाहेर पलायन केलं आहे.

तालिबाने अफगाणिस्तानला पुन्हा ‘इस्लामिक इमिरेट्स ऑफ अफगाणिस्तान’ (आयइए) जाहीर केलं आहे. तालिबानने काबूलवर ताबा मिळवल्याने आता अफगाणिस्तान प्रशासनाच्या हाती फारसे काही उरलेले नाही. महिलांचे अधिकार हिरावून तालिबान पूर्वीप्रमाणे अमानुष राजवट सुरू करील, या भीतीने अनेक नागरिक देश सोडून जाण्याच्या तयारीत आहेत.

तालिबानने नागरिकांना संरक्षणाची हमी देऊनही पूर्वानुभवामुळे भयभीत नागरिक आणि परदेशी दूतावासांतील कर्मचाऱ्यांनी देशाबाहेर पडण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे. काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाचा परिसर अफगाणी सुरक्षा दलांनी पाश्चिमात्य देशांच्या लष्करांसाठी मोकळा केला आहे.

अमेरिकी आणि नाटो फौजांनी सुमारे दोन दशके अफगाणी सुरक्षा दलांची बांधणी करण्यासाठी अब्जावधी डॉलर खर्च केले. तरीही तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानवर एका आठवडय़ातच ताबा मिळवला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News