कोरोना वाढल्याने हा तालुका पाच दिवस बंद

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :-गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने संपूर्ण तालुका पाच दिवसांसाठी बंद करण्यात आला असल्याचे तहसीलदार ज्योती देवरे यांनी बुधवारी जाहीर केले.

रुग्णालये, औषध दुकाने, रुग्णवाहिका वगळता इतर सर्व व्यवसाय सोमवारी सकाळी ७ पर्यंत पूर्ण बंद राहतील.

अनावश्यक कारणांसाठी रस्त्यावर फिरणाऱ्यांना एक हजार रुपये दंड करण्यात येणार आहे. तालुक्यात नव्याने ३०० बाधित आढळले.

नगर शहरासह इतर तालुक्यांच्या तुलनेत पारनेरची रुग्णसंख्या तिसऱ्या क्रमांकाची आहे. पहिल्या क्रमांकावर असलेल्या नगर शहरात ५८३, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राहाता तालुक्यात ३०४ रुग्ण आढळले आहेत.

बुधवार सकाळी सात वाजता तहसीलदार देवरे आणि पोलिस निरीक्षक घनश्याम बळप रस्त्यावर उतरले.

खालच्या वेशीजवळील चौकात परवानगी नसतानाही भरलेला भाजी बाजार बंद करण्यात आला. तहसीलदारांशी हुज्जत घालणाऱ्या भाजीविक्रेत्यांना पोलिसी हिसका दाखवत ताब्यात घेण्यात आले, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe