अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- शहरात गेल्या १० वर्षांपासून प्रत्येक १२ दिवसाला शहराला पाणी सुटते. पाथर्डीला मात्र दोन दिवसाला पाणी सुटते. नुकतेच पाथर्डी येथील शहरासाठी १७ लाख रुपये खर्चाची पाण्याच्या टाकीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम विद्यमान लोकप्रतिनिधींनी केला.
शेवगावला वंचित ठेवण्याचे काम विद्यमान लोकप्रतिनिधी करत आहेत. त्यांचे मतदारसंघाकडे दुर्लक्ष झाले असून फक्त पाथर्डी केंद्रस्थानी आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे यांनी केला आहे.
फुंदे यांनी निवेदनात म्हटले आहे, लोकसभेच्या वेळी दक्षिणेचे खासदार यांनी व लोकप्रतिनिधींनी सांगितले होते की, शेवगाव शहरासाठी पाण्याची योजना अमलात आणू. मात्र या दोघांनी या प्रश्नाला तिलांजली दिली आहे.
राष्ट्रवादीच्या काळात टंचाईच्या काळात जायकवाडीचे पाणी पूर्णपणे आटले होते. त्याकाळात घुले बंधूंनी मारुतराव घुले पाटील कारखान्याच्या माध्यमातून जनरेटर लावून शेवगावला दोन दिवसाला पाणी पुरवलेे. १० वर्षात लोकप्रतिनिधी शेवगाव शहराला वंचित ठेवण्याचे काम करीत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम