शिक्षकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अश्‍लील व्हिडिओ टाकणार्‍या त्या शिक्षकाचे निलंबन करावे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- दिव्यांग शिक्षकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अश्‍लील व्हिडिओ टाकणार्‍या शिक्षकाचे निलंबन करण्याची मागणी सावली दिव्यांग संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले असून, सदर शिक्षकाचे निलंबन न झाल्यास दि.16 मार्च रोजी जिल्हा परिषद समोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष व शिक्षक बँकेचे माजी संचालक साहेबराव अनाप हे प्राथमिक शिक्षक असून यांनी शिक्षकी पेशाला काळीमा फासणारे कृत्य केले आहे. संगमनेर तालुक्यातील दिव्यांग शिक्षकांनी शिक्षक संघ संगमनेर नावाचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे.

या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तालुक्यातील शिक्षक, कार्यकर्ते व महिला शिक्षिकाही आहेत. या ग्रुपवर साहेबराव अनाप यांनी दि.3 मार्च रोजी दुपारी अश्‍लील व्हिडिओ पाठवून आपल्या नालायकतेचा कळस गाठला. फक्त एक व्हिडिओ न पाठवता त्यांनी अनेक पॉर्न व्हिडिओ या ग्रुपवर पाठविले.

अनेक दिव्यांग माता-भगिनी, आदर्श शिक्षक या ग्रुपवर असल्याने सर्वांच्या भावना दुखावल्या गेल्या असून, शिक्षण क्षेत्रात तीव्र नाराजी पसरली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. दिव्यांग शिक्षकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अश्‍लील व्हिडिओ पाठविणारे अनाप यांच्यावर जबाबदारी निश्‍चित करून त्यांना तात्काळ सेवेतून निलंबित करण्याची मागणी सावली दिव्यांग संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe