जवस शेतीकडे शेतकऱ्यांचा कल; एकत्रीत येऊन फुलवली शेती

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Krushi news :- शेतकऱ्यांचा जवस शेती कडे बघण्याचा दृष्टिकोन हळूहळू बदलत आहे. गेल्या काही 15 ते 20 वर्षांपूर्वी जवस शेती ही दरवर्षी केली जायची पण काही कालांतरानंतर सोयाबीन पाम तेलाचा वापर वाढत गेला.त्यामुळे लोकांचे जवस तेलाकडे दुर्लक्ष झाले.

तर त्यामुळे सद्यस्थितीत जवसाचे बियाणे उपलब्ध होत नसल्याने लोकांचा कल नगदी पिकाकडे वळला आहे. जवस तेलाचा दररोजच्या आहारात वापर केल्यास सांधेदुखी, पाठदुखीचा त्रास कमी करण्यास मदत होत होती. तर उत्तम आरोग्यासाठी जवस तेलाचा वापर केला पाहिजे.

पारंपरिक पीक पद्धतीअंतर्गत वरोरा तालुक्यातील मंडल कृषी अधिकारी, शेगांव (बु.) आत्मा प्रकल्प, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात शेगाव मंडलातील सोनेगाव व पिंपळगाव येथे जवस पीक प्रात्यक्षिक राबविण्यात आले. त्यात गावातील २५ शेतकऱ्यांनी सेंद्रिय व जैविक पध्दतीने शेती करण्यासाठी सहभाग दाखवला.

भारत हा कृषिप्रधान देश जरी असला तरी गळीत धान्य मोठ्या प्रमाणात आयात करावी लागते.म्हणून
गळीत धान्याचे क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने मंडल कृषी अधिकारी, शेगांव बु. अंतर्गत मागील चार वर्षात भुईमूग, मोहरी, तीळ, जवस या पिकाचे विविध प्रयोग राबवून गळीत धान्य क्षेत्र वाढ करण्याचे कार्य अविरत सुरू आहे.

मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संशोधित वाण
एलएसएल – ९३ची प्रत्येकी एक एकर क्षेत्रावर पेरणी केली आहे.सेंद्रिय शेतीमध्ये सदैव कार्यरत असलेले पिंपळगाव येथील शेतकरी  नत्थू गारघाटे यांनी सांगितले की, पांढरी फुले असलेली व भरपूर फुटवे असलेल्या या जवस वाणांचे उत्पादन निश्चितच पाच ते सहा क्विंटल प्रतिएकरी येते.

तर गावाचे शेतकरी अशोक भिमटे, संदीप भोगेकर, वंदना गारघाटे, मुरलीधर भोंगळे, सोनेगाव येथील प्रगतशील शेतकरी जयंत बुराण, राहुल खिरटकर, देविदास लिल्हारे, कवडू ठाकरे, वसंता बुराण आदी शेतकऱ्यांनी यावर्षीच्या लागवडीमधून उत्पादित होणाऱ्या जवसापासून गटाच्या माध्यमातून लाकडी तेलघाण्याच्या साहाय्याने तेल काढून विक्री करण्याचा मानस बोलून दाखविला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe