अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- पाथर्डी तालुक्यांतील जवखेडे खालसा येथील सरगड वस्तीवर धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद करण्यात आला आहे.
भक्ष्य व पाण्याचा अभाव यामुळे वन्यप्राणी मानवी वस्त्यांकडे धाव घेऊ लागले आहेत. मात्र, लपायला जागा नसल्यामुळे तसेच भक्ष्य मिळविण्यासाठी बिबट्या माणसांवर हल्ले करू लागला आहे.
यातच पठारी तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. त्याने अनेक शेळ्यांची शिकार केली. शेवटी वनविभागाने भक्ष्यांसह संबंधित ठिकाणी पिंजरा लावला. पिंजऱ्यातील (भक्ष्य) शेळीच्या आवाजाने उसातून निघालेला बिबट्या पिंजऱ्याचे बाहेरून तिला पंजे मारत होता.
तशी शेळी ओरडत होती. नाईलाजने बिबट्या पिंजऱ्यात घुसला आणि जेरबंद झाला. गावकर्यांनी याबाबतची माहिती वनविभागाला तातडीने कळविली. काही वेळातच सहाय्यक उपवनसंरक्षक रमेश देवखीळे,
तिसगाव वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब वाघुळकर, वनपाल व्ही एम गाढवे, यांच्यसह वनविभागाचे अन्य कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. त्यांनी बिबट्याला नगरमध्ये आणले..
दरम्यान सहा वर्षाचा नर जातीचा हा बिबट्या माळशेज घाटातील जंगल परिसरात सोडून देण्यात आला.
बिबट्या जेरबंद झाल्याने पाथरी तालुक्यातील जवखेडेखालसा, जवखेडे दुमाला, कामत शिंगवे, आडगाव, रेणुकावाडी, हनुमान टाकळी, कोपरे हा परिसर भयमुक्त झाला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम