अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- श्रीगोंदे तालुक्यातील कोळगाव येथील कन्हेरमळा येथे मंगळवारी मध्यरात्री किरण संजय गायकवाड यांच्या घरी अज्ञात चोरट्याला चोरी करून फरार होत असताना परिसरातील नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
परंतु बेलवंडी पोलिस ठाण्यात घेऊन जात असताना आरोपीने चालत्या गाडीचे दार उघडून पळून गेला. याप्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात गायकवाड यांच्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल केला.

file photo
कोळगाव शिवारातील कन्हेरमळा येथे किरण संजय गायकवाड यांच्या घरी मंगळवारी (६ जुलै) मध्यरात्री घराचा दरवाजा उघडून सोन्याच्या बाळ्या,
तसेच २ हजार रुपये रोख असा ५ हजारांचा मुद्देमाल चोरी करून फरार होताना त्यांना परिसरातील नागरिकांच्या मदतीने पकडले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम