उड्डाणपुलासाठी वापरण्यात येणारे साहित्यच चोरटयांनी केले लंपास

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :-  गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला उड्डाणपुलाचा विषय मार्गी लागला आणि उड्डाणपुलाचे काम जोमाने सुरु देखील झाले. शहराच्या वैभवात भर घालणारी या वास्तूचे दिवसरात्र काम सुरु आहे.मात्र नुकतीच एक धक्कादायक घटना घडली आहे.

नगर शहरामध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू झाले असून या या ठिकाणी असणारे लोखंडी प्लेट सुमारे 25 हजार रुपयांचा माल चोरीला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून याप्रकरणी कॅम्प पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे आहे.याबाबत अधिक माहिती अशी कि, गेल्या पाच महिन्यापासून नगर शहरामध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू आहे.

उड्डाणपुलासाठी लागणारे साहित्य हे आजूबाजूच्या परिसरामध्ये ठेवण्यात आले होते, होटेल अशोका जवळ असलेले लोखंडी , सुमारे 64 मीटरच्या लांब, 32 हून अधिक प्लेट या काल रात्रीच्या सुमाराला चोरीला गेले आहे सदरची बाब संबंधित निदर्शनास आल्यानंतर त्यांना या ठिकाणी चोरी झाल्याचे लक्षात आले. सदर प्लेटची रक्कम 25 हजार आहे.

पोलिस ठाण्यांमध्ये डीआर अग्रवाल या कंपनीच्या वतीने सिक्युरिटी इन्चार्ज प्रदीप बडवा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe