थोरात कारखाना करणार ऑक्सिजन निर्मिती, राज्यातील पहिला कारखाना ठरणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :- आपले वर्षभराचे वेतन आणि नेतृत्वाखालील अमृत उद्योग समूहाच्या 5000 कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठीचा निधी सीएम रिलीफ फंडासाठी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर अधिपत्याखालील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याद्वारे ऑक्सिजनची निर्मिती करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतला आहे.

त्यासाठी तातडीने स्कीड माऊंटेड ऑक्सीजन प्लॅन्टची खरेदी करण्यात आली असून येत्या पंधरा दिवसात हा ऑक्सीजन प्लांट कार्यान्वित होणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी दिली.

मंत्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ऑक्सीजन निर्मिती करणारा सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखाना पहिला साखर कारखाना ठरणार आहे. काही दिवसांपूर्वीच कारखान्याच्या वतीने 500 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे.

संगमनेरमधील कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता येथील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. त्यातच ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर कमतरता भासू लागल्याने थोरात कारखान्याने ऑक्सिजन निर्मितीचा निर्णय घेतला आहे.

कारखान्याने यासाठी तैवान येथून तातडीने स्किड माऊंटेड ऑक्सीजन प्लॅन्टची खरेदी करण्यात आली आहे. संगमनेरमध्ये हा प्लॅन्ट सुरू करण्यात येणार असून त्याद्वारे येत्या पंधरा दिवसात ऑक्सिजन निर्मितीसाठी सुरवात होईल.

❗या प्लॅन्टमधून कोविड केअर सेंटर व तालुक्यातील खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा केला जाणार आहे.लवकरच सुरू होत असलेल्या या प्लॅन्टवर 7 घनमीटर क्षमतेचे 85 ऑक्सिजन सिलिंडर दररोज भरले जाऊ शकतील. यातून दररोज 1टन 190 किलो ऑक्सिजन निर्मिती होईल.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe