दुचाकीवरून आलेल्या तिघांनी पायी चालणाऱ्या एकास बसस्थानकाजवळ लुटले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :- रात्री पावणे अकरा वाजता माळीवाडा बस स्थानकाकडे पायी चाललेल्या एका व्यक्तीला दुचाकीवरून आलेल्या तिघांनी थांबवून बळजबरीने रोख रक्कम, मोबाईल असा 45 हजार रूपयांचा ऐवज लुटला.

दरम्यान शहरात लुटमारीचे प्रकरण वाढत असताना या भुरट्या चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना सातत्याने अपयश येत असल्याचे दिसून येत आहे.

संतोष प्रकाश धनवडे (वय 35 रा. बाभळगाव ता. कर्जत) असे लुट झालेल्या चालकाचे नाव आहे. धनवडे यांनी याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी दुचाकी (एमएच 16 बीएल 8147) वरील तीन अनोळखी चोरट्यांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मार्केटयार्डच्या समोरील सुखसागर हॉटेलकडून धनवडे माळीवाडा बस स्थानकाकडे पायी जात असताना एलपीजी पेट्रोल पंपाजवळ दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना ओ मामू अशी हाक मारली. धनवडे थांबताच ते तिघे त्यांच्याजवळ आले.

त्यांनी धनवडे यांच्याकडून बळजबरीने खिशातील रोख रक्कम, मोबाईल काढून घेतला व घटनास्थळावरून निघून गेले. धनवडे यांनी झालेला प्रकार मंगळवारी रात्री पोलिसांना सांगितला. पोलिसांनी जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विवेक पवार करीत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe