नेवासा तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या आठ हजार पार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 9  मे 2021 :- बेजाबदार नागरिकांमुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अत्यंत वेगाने होऊ लागला आहे. शासनाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याने या विषाणूचा फैलाव होऊ लागला आहे.

यामुळे जिल्ह्यातील बाधितांची आकडेवारी वाढू लागली आहे. यातच नगर जिल्ह्यामध्ये हजारोंच्या संख्येतच बाधितांची भर पडते आहे.

दरम्यान जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील कोरोना बाधितांच्या संख्येने नुकताच आठ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तालुक्यातील 54 गावांमधून शनिवारी 228 करोना संक्रमित आढळून आले.

नेवासा शहरात सर्वाधिक 36, घोडेगावात 28, सोनईत 18, भेंडा बुद्रुक येथे 15, तर वडाळा बहिरोबा येथे 11 संक्रमित आढळले.

तालुक्यातील केवळ 56 गावांतून 228 संक्रमित आढळून आल्याने तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 8076 झाली आहे.

नागरिकांनी अत्यावश्यक कारण असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच नियमितपणे मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News