अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- एप्रिल महिन्यापासून नगर शहरात सुरु असलेल्या लॉकडाऊन मुळे सर्व व्यापारी व दुकानदार अडचणीत आले आहेत. दुकाने बंद असली तरी दुकानदारांचा व व्यापाऱ्यांचा दैनदिन खर्च चालूच असल्याने व्यापारींचे कंबरडे मोडले आहे.
आता नगर मधील परीस्थित सुधारत असून दैनदिन रुग्णांच्या संख्याही कमी होत आहे. राज्य सरकारने इतर जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनमध्ये सूट दिली आहे. या जिल्ह्यांप्रमाणे नगर मध्येही लॉकडाऊन मध्ये सूट द्यावी व तातडीने बाजारपेठ खुली करावी,
अशी मागणी खा.सुजय विखे यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची भेट घेवून केली. नगर शहर भाजपा व्यापारी आघाडीच्या वतीने खा.सुजय विखे यांच्या यांच्या नेतृत्वाखाली विविध व्यापारींच्या शिष्ठमंडळाने जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची कार्यालयात भेट घेवून निवेदन दिले.
यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी पुढील सोमवारी पुन्हा शहराचा सर्वे करून सहानुभूतीने निर्णय घेवू असे आश्वासन शिष्ठमंडळास दिले. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, सुमारे २ महिन्यापासुन टाळेबंदी असल्याने व्यापारी वर्गाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.
डबघाईला आलेली परिस्थिती निवळण्यासाठी दुकान उघडण्याशिवाय आमच्यापुढे पर्याय उरलेला नाही. आपल्या नियमाच्या आणि अटीचे तंतोतंत पालन करणारा हा व्यापारी वर्ग आहे.
यापुढेही शासनाने सर्वतोपरी सहकार्य करण्याची आमची भुमिका राहिल म्हणुन ३ जुन पासुन दुकानांना वेळेची मर्यादा घालुन नियमाचे बंधन घालुन दुकाने चालू करण्यास परवानगी द्यावी. अशी विनंती करण्यात आली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम