ट्रॅक्टर उलटला; चालक जागीच ठार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- राहुरी तालुक्यातील कानडगाव शिवारात मका घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटून ट्रॅक्टर चालकाचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना काल दुपारी घडली.

याबाबत अधिक माहिती अशी कि, राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील पांडुरंग रामभाऊ मुसाळे (वय ३०) हे बुधवारी दुपारी आपल्या कडील ट्रॅक्टरमध्ये मका घेऊन जात असताना अचानक ट्रॅक्टर उलटला.

यात मुसाळे हे जागीच ठार झाले. दरम्यान या घटनेची माहिती समजताच स्थानिक नागरिक जमा झाले. त्यांनी तातडीने देवळाली प्रवरा येथील साई प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेस पाचारण केले.

मयत मुसाळे यांच्या मृतदेहाचे लोणी येथे शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान या घटनेने म्हैसगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News