ज्ञानसंपदा स्कूल इंग्लिश मिडीयम ची परंपरा कायम

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- महामारीच्या भयानक संकटात सातत्यपूर्ण असे शिक्षण देण्यासाठी अविरत कार्यक्षम असलेल्या ज्ञानसंपदा स्कूल(इंग्लिश मिडीयम) ने दरवर्षीप्रमाणेच १००%निकालाची परंपरा कायम राखली आहे.

६२ विद्यार्थ्यांपैकी५१ मुलांनी विशेष श्रेणी प्राप्त केली असून मुलींनी बाजी मारली आहे.यामध्ये कु.स्नेहा पवार ही ९६.८३%मिळवून विद्यालयात प्रथम आली आहे

तर कु. गायत्री मांडके द्वितीय ९४.७६%, कु. चैत्राली कुलकर्णी तृतीय ९२.६७%, कु.जुई पडाळकर चतुर्थ ९१.५०%, व कु. मोनिका झिकरे आणि चि. कमलेश वट्टमवार यांनी ९०.६७% मिळवून पाचवा क्रमांक मिळविला आहे.

या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शिवांजली अकोलकर तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रविण जी बजाज,स्कूल कमिटी चेअरमन श्री. कारभारी जी भिंगरे,मानद सचिव श्री.अरुण जी कुलकर्णी,विश्वस्त श्री.मिलिंद जी गंधे,खजिनदार अविनाश जी बोपोर्डीकर

तसेच सर्व विश्वस्त व पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांच्या या यशासाठी अव्याहतपणे विविध व नवनवीन अध्यापन पद्धतींचा अवलंब करून अथक प्रयत्न करणारे

अध्यापक सौ.शिवांजली अकोलकर,श्री.प्रसाद बर्वे,सौ. उज्वला पंडीत,श्री.योगेश नेरीकर,श्री.कैलास जाधव,सौ. निता बोरुडे,सौ.पूजा भाटिया,सौ.सोनाली पंडीत,

सौ.अस्मिता चव्हाण,सौ. दिप्ती पालवे,सौ.सोमा दास,वृषाली पटेकर,अमरीन खान या सर्व यशाच्या मानकरी शिक्षक वर्गाचे अभिनंदन संस्थेच्या पदाधिकार्यांनी केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe