पैसे सुटे करायचे म्हणून ट्रक ड्रॉयव्हरने घेतले लॉटरीचे तिकीट अन् जिंकले 15 कोटी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :-  नशिब कधी बदलेल हे कोणालाही सांगता येत नाही. काही लोकांना नशीब श्रीमंत बनवते. कारण त्यांच्या आयुष्यात अशा काही घटना घडतात ज्याने त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलले.

एका ट्रकचालकाच्या बाबतीत असाच एक प्रकार घडला. या घटनेने तो रातोरात 15 कोटी रुपयांचा मालक बनला आहे. अमेरिकेच्या मिशिगन येथील ही घटना असून ट्रक ड्रायव्हरने आपली ओळख सांगण्यास मनाई केली आहे.

ट्रकच्या चाकांमध्ये हवा कमी असल्याने ते एका पंपावर थांबले होते. एअर मशीनमध्ये टाकण्यासाठी सुटे पैसे नसल्याने ते जवळच असलेल्या लॉटरी सेंटरमधून 10 डॉलर रुपयांची ‘लकी सेव्हन एस’ या लॉटरीचे तिकीट खरेदी करायला गेले.

परंतु दुकानदाराने चुकून त्यांना 20 डॉलर रुपयांचे लॉटरीचे भलतेच तिकीट दिले. त्यांनीही त्याच्याशी वाद न घातला तिकीट ठेवून घेतले.

याच तिकिटामुळे त्यांचे नशीब फळफळले असून 2 मिलियन डॉलर म्हणजेच 15 कोटी रुपयांचे बक्षीस त्यांना मिळाले आहे.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment