करंजी घाटातील धोकादायक वळणावर ट्रक उलटला

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- पाथर्डी तालुक्यातील कारंजी घाटातील धोकादायक वळणावर एक ट्रक उलटल्याची घटना आज घडली आहे.

दरम्यान सुदैवाने या अपघातात सुदैवाने जीवित हानी झाली आहे. मात्र या अपघातात ट्रकचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, मुंबईहून नागपूरकडे सुमारे वीस टन कापसाच्या गाठी घेऊन जात असलेला ट्रक आज दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास करंजीघाट उतरत होता.

दरम्यान या घाटातील एका धोकादायक वळणाजवळ समोरून येणार्‍या वाहनाने या ट्रक चालकाला हूल दिल्याने हा कापसाने भरलेला ट्रक रस्त्यावरच उलटला असून या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. परंतु ट्रकचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe