अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:- यश अपयश हे कोणी जन्माला घेवून येत नाही, लोणी खुर्द गावात नागरीकांना फायदा होईल या दृष्टीनेच विकास कामे झाली. मांजर जरी डोळे झाकून दुध पीत असली तरी आजूबाजूची चाहूल तिला माहीत असते.
विखे पाटील परिवाराची नाळ सदैव जनतेशी जोडलेली असल्याने सामान्य माणसासाठी काम करण्याची जबाबदारी विखे पाटील परीवार सदैव निभावेल असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
पंचायत समिती, राहाता तहसिल कार्यालय व जनसेवा फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लोणी खुर्द येथील संकल्प मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात रमाई आवास योजना, संजय गांधी, श्रावणबाळ निराधार योजना व महिला बालकल्याण विभागाअंतर्गत कौशल्यपुर्ण प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण सौ.विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
पंचायत समितीच्या संभापती नंदाताई तांबे, उपसभापती ओमेश जपे, पंचायत समिती सदस्य संतोष ब्राम्हणे, शांतीनाथ आहेर, बापूसाहेब आहेर, भारत घोगरे, माजी सरपंच मनिषा आहेर, डॉ.हरिभाऊ आहेर, गटविकास आधिकारी समर्थ शेवाळे,
नायब तहसिलदार श्री.भांगरे आदिंसह लाभार्थी उपस्थित होते. सौ.शालिनीताई विखे पाटील म्हणाल्या की, शासनाचे निकश दिवसेंदिवस बदलत चालले असून, शासनाच्या विविध योजनांची माहीती घेवून योजनेच्या लाभा संदर्भात काही अडचण असल्यास कधीही संपर्क साधा विखे पाटील परिवाराकडून आपल्याला सर्व मदत करुन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी पाठपुराव केला जाईल आशी ग्वाही त्यांनी दिली.
सर्व त्रृटी दूर करुन घरकुलांना मंजुरी देण्यात आली असल्याचे स्पष्ट करून माजीमंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार संघात विकासाची प्रक्रीया निरंतर सुरु असून, लोणी खुर्द गावात ३० कोटी रुपयांची कामे मार्गी लावली आहेत यामध्ये प्रामुख्याने ,
सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापनाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला असून, मंत्रालय स्तरावरही प्रलंबित असलेल्या अडीच ते तीन कोटी रुपयांच्या प्रस्तावांना लवकरचम प्रशासकीय मान्यता मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी विविध योजनेतील लाभार्थींना मंजूरी पत्राचे वितरण सौ.विखे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.हरिभाऊ आहेर यांनी केले तर आभार बापूसाहेब आहेर यांनी मानले.कार्यक्रमास ग्रामस्थ विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved