अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर चोऱ्या होत आहे. यातच सोनईत चोरट्यांच्या बंदोबस्तासाठी पोलीस यंत्रणेबरोबर आता 120 युवकांचा फौजफाटा रात्रीची गस्त घालू लागला आहे.
युवकांनी गस्त सुरू करताच चोरटे गायब झाले आहेत. असे चित्र सध्या दिसून येत आहे. सोनई ग्रामपंचायतीच्या सभागृहात पत्रकार विनायक दरंदले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 100 युवकांचे ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्यात आले.
बैठकीत युवकांनी रात्री गस्त घालत असताना येत असलेल्या अडचणी विशद केल्या. सहायक पोलीस निरीक्षक कर्पे यांनी आवश्यक सूचना करून गावाच्या हितासाठी युवकांनी दिलेली साथ कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
सोनई गाव मोठे असून सर्व गल्ली, वसाहत, गावात येणारे रस्ते व्यापारी पेठ आणि खरवंडी, घोडेगाव, राहुरी, हनुमानवाडी, बेल्हेकरवाडी,
श्रीरामवाडी आदी सर्वच रस्त्यांवर बंदोबस्त व नाकेबंदी आवश्यक असल्याची बाब लक्षात घेऊन जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या सुचनेनंतर उदयन गडाख यांनी मुळा कारखाना व एज्युकेशनच्या सुरक्षा कर्मचार्यांचा बंदोबस्तही गावासाठी तैनात केला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम