बळीराजाची फसवणूक करणाऱ्या त्या भामट्याला पोलिसांनी केले जेरबंद

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :- शेतकऱ्यांची फसवणूक करून गेल्या 2 वर्षांपासून फरार असणा-या आरोपीस नगर तालुका पोलिसांनी जेरबंद केले आहे.

दीपक शिवाजी गायकवाड (वय 27 रा निमगाव वाघा) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी दीपक गायकवाड यावच्याविरुद्ध दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 13 मार्च 2019 रोजी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याबाबत अधिक माहिती अशी कि, सदर आरोपी हा त्यावेळी महा इ सेवा केंद्र चालवत असे त्याचा फायदा घेऊन पीक विम्यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक करून फरार झाला होता.

सदर आरोपी लॉकडाउनमध्ये आल्याची माहिती पोलिसांना मिळताच, नगर तालुका पोलिस पथकाने जाऊन आरोपी दीपक गायकवाड याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीस दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe