भिंगारमधील बिकट बनलेला पाणी प्रश्‍न सोडवावा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-  भिंगारमध्ये बिकट बनलेला पाणी प्रश्‍न तात्काळ सोडविण्याची मागणी अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन छावणी परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांना देण्यात आले यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनी खरारे, जिल्हा सचिव राहुल लखन, भिंगार शहराध्यक्ष साहिल कुडिया, सुरज गोहेर आदी उपस्थित होते.

भिंगारमध्ये मागील काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. शहरापेक्षा अधिक दराने पाणीपट्टी भरुन देखील येथील नागरिकांना पाणी मिळत नाही. पिण्यासाठी व दैनंदिन वापराच्या पाण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे.

भिंगारला पंधरा ते वीस दिवसाआड पाणी मिळत आहे. कोरोनाच्या संकटकाळात नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. भिंगारमध्ये मोजक्या टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असल्याने सदर टँकरचे पाणी एका भागापुरते देखील पुरत नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

छावणी परिषदेने तात्काळ पाणी प्रश्‍नाची दखल घेऊन नागरिकांना वेळेवर पुरेश्या प्रमाणात पाणी मिळण्याची व्यवस्था करावी, तो पर्यंत भिंगारच्या प्रत्येक भागाकरिता टँकरने पाणी उपलब्ध करुन देण्याची मागणी अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe