अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- मुंबईत 15 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा, रायगड, रत्नागिरीत रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे, पालघर जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. पावसासंदर्भातली एक मोठी बातमी हवामान खात्याने दिली आहे.
अहमदनगर जिल्ह्यासह पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, धुळे आणि नंदूरबारमध्ये देखील पुढील पाचही दिवस चांगला पाऊस बरसण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर घाट परिसरात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्यानं मुंबईसह 8 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.
त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं, घराबाहेर पडू नये असं आवाहनही करण्यात आलंय. महाराष्ट्रात 4-5 दिवसात चांगला पाऊस होणारंय. मुंबईत आज यलो अलर्ट देण्यात आलाय. रायगड, रत्नागिरीत आज रेड अलर्ट असेल.
मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही चांगल्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीय. मराठवाड्यात पुढील 5 दिवस सर्वच ठिकाणी पाऊस अपेक्षित, आहे. ज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामानविभागाकडून वर्तवला जात आहे.
ज्यात 70 मिमी ते 120 मिमीपर्यंत पाऊस बरसण्याचा अंदाज आहे तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे. ज्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो.
1 जूनपासून ते आतापर्यंत मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचं भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम