अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- सद्यपरिस्थितीत करोना विषाणूचा संसर्ग राज्यात वेगाने पसरत आहे. त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी याने जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू केले आहे.
तसेच कर्जत तालुक्यातील खेड व आसपासच्या गावात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खेड ग्रामपंचायत व कोरोना दक्षता समितीने सोमवार, दि. ९ ऑगस्ट २०२१ रोजी खेड येथील आठवडा बाजार बंद ठेवण्याचे पत्राद्वारे कळवले आहे.
पत्रात म्हटले आहे, वैद्यकीय सेवा वगळता इतर व्यवसाय पूर्ण दिवसभर बंद राहतील. नागरिक, व्यापारी, दुकानदार यांनी नियमाचे उल्लंघन केल्यास त्या कारवाईस संबंधित व्यक्ती जबाबदार राहील.
पत्रावर सरपंच व पोलीस पाटील यांच्या सह्या आहेत. करोना विषाणूच्या प्रसाराचे माध्यम पाहता, सदर विषाणूची लागण एका संक्रमीत रूग्णांकडून अन्य व्यक्तीस त्यांच्या संपर्कात आल्याने होते.
जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागात भरविल्या जाणाऱ्या आठवडा बाजाराच्या ठिकाणी गर्दीमुळे आरोग्य विषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे खेड ग्रामपंचायतने हा निर्णय घेतला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम