अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :- अहमदनगर च्या नेवासे तालुक्यातील सोनई येथील जेष्ठ पत्रकार व जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष स्व.सोपानराव दरंदले यांच्या पत्नी पद्माबाई सोपानराव दरंदले (वय ६०वर्षे) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
त्यांच्या मागे तीन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. एकता पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विनायक दरंदले व राजेंद्र दरंदले यांच्या त्या भावजय तर शनैश्वर शनैश्वर देवस्थानचे जनसंपर्क अधिकारी अनिल दरंदले, उद्योजक सुनिल व सुधीर दरंदले यांच्या मातोश्री होत्या.
स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्र, यश ग्रुप, नेवासा तालुका एकता पत्रकार संघ, सोनई प्रेस क्लब, छत्रपती शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|