अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :- अलीकडे भुरट्या चोरट्यांनी जिल्ह्यात नुसता धुमाकूळ घातला आहे. दररोज कुठे ना कुठे चोरीच्या घटना घडत आहेत. या घटनांमुळे नागरिक पुरते बेजार झाले आहेत. मात्र जामखेड पोलिसांनी पवनचक्कीचे साहित्य चोरणाऱ्या चोरट्यांना अवघ्या चोवीस तासाच्या आत मुद्देमालासह जेरबंद केले आहे.
महेंद्र विष्णु पवार, बालाजी बापु काळे, रमेश अशोक शिंदे व उमेश बलभिम काळे अशी त्या चौघांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील साकत परीसरात एका पवनचक्कीच्या कंट्रोलरूम मधुन अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या केबल्स व सीटी मोड्युल चोरून नेले होते.
या प्रकरणी कंपनीचे ज्युनियर इंजिनियरने जामखेड पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलिस उपनिरीक्षक राजु थोरात व गुन्हे शोध पथक याबाबत तपास करत असताना त्यांना ही चोरी करणाऱ्या टोळीची गुप्त खबऱ्याने माहिती दिली.
त्या नुसार पोलिसांच्या पथकाने महेंद्र विष्णु पवार याच्या घरी जावुन झडती घेतली असता ३५ किलो तांब्याची तार मिळुन आली.
त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल करून इतरसाथिदारांची नावे सांगितली. यानुसार या सर्वांना ताब्यात घेतले .
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम