अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:-नगर शहरातील अत्यंत वर्दळीचे ठिकाण असलेल्या कापड बाजारात महिलेची रोख रक्कम, चांदीचे चाळ व सॅमसंग कंपनीचा मोबाईल चोरट्याने लांबविला असल्याची घटना घडली आहे.
दरम्यान याबाबत वैशाली उमेश देठेकर यांनी फिर्याद दाखल केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, देठेकर या हनुमाननगर येथील रहिवाशी असून त्या कापड खरेदी करण्यासाठी कापडबाजारात आल्या होत्या.
द्वारकादास शामकुमार ते बाबा टॉईज दुकानादरम्यान ही घटना घडली. चोरट्याने १८०० रुपये किंमतीचे चांदीचे चाळ, ४ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम व सॅमसंग कंपनीचा मोबाईल लंपास केला.
कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास म. पो. ना. पटारे हे करत आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शहर परिसरात चोऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे,
यामुळे महिला वर्गामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या चोरी, लुटमारीच्या घटनांना आळा बसावा यासाठी पोलीस प्रशासनाने गस्त घालण्याची मागणी सवर्सामान्य नागरिकांमधून होऊ लागली आहे.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved